संदीप पेंडसे - लेख सूची

डार्विनचा उत्क्रांतिवाद व मार्क्सवाद’

चार्ल्स डार्विन याचा ऑरिजिन ऑफ स्पीशीज हा ग्रंथ १८५९ साली प्रसिद्ध झाला. जीवनावर सखोल भाष्य करणारी अनेक पुस्तके त्याकाळीही प्रसिद्ध होऊ लागली होती. अजून माध्यमक्रांती झाली नव्हती. शिक्षण सार्वत्रिक वा सामुदायिक झाले नव्हते. युरोपमध्येही साक्षरतेचा प्रसार होऊ लागला असला तरी तो बहुशः अक्षरओळखीपुरताच मर्यादित होता. वाचनसंस्कृती अभिजनवर्गापुरतीच मर्यादित होती. गहन विचारांचा प्रसार व प्रभाव अर्थातच …